नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच देशभरातील वाहनचालकांना मोठा फटका बसणार असून १ एप्रिलपासून मध्यरात्रीपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर वाढणार आहेत. दरवर्षीप्रमाणे महागाई निर्देशांकाच्या आधारे टोल दरांचे पुनर्निर्धारण करण्यात येथे आणि एक एप्रिल पासून नवीन पथकर दर देशभर लागू होतात.. वाढीव टोल दराचे प्रसिद्धीकरण देखील करण्यात आले आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत सध्या सुमारे १,०८० पेक्षा अधिक टोल प्लाझा कार्यरत आहेत. या सर्व टोलनाक्यांवर कार, जीप, बस, ट्रक आणि अवजड वाहनांसाठी सरासरी ३ ते ५ टक्क्यांची दरवाढ लागू केली जाणार आहे. देशात विविध प्रकारचे 3000 टोलनाके आहेत. राज्यात एन एच ए आय चे 70,एम एस आर डी सी चे 35 तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमारे 20 ते 25 टोल नाके आहेत. सोलापूर- पुणे, सोलापूर -सांगली, सोलापूर- हैदराबाद, सोलापूर- विजयपूर, सोलापूर -अक्कलकोट, तसेच दोन्ही पालखी मार्गावर वाढ आकार ला जाणार आहे. राज्यभरातील बहुतांश टोल नाक्यावर उद्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून वाढीव पथकर द्यावा लागणार आहे.

