साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोलापूर तसेच पुण्याच्या बाजारपेठेमध्ये उत्साह संचारला आहे. वाहन, घर, जागा, फ्लॅट, सोने तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी मोठ्या प्रमाणावर होणार असल्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देखील ठेवण्यात आले आहेत. टाटा मोटर्स अधिकृत डीलर्स पद्मजा मोटर्स, चव्हाण ऑटोमोबाईल्स, सेलिब्रेट किया मधून आज मोठ्या प्रमाणावर चार चाकी गाड्यांची डिलिव्हरी होत आहे. दुचाकी वाहने घेण्याकडे देखील ग्राहकांचा मोठा कल आहे. सुमारे 700 ते 800 चार चाकी गाड्या आणि एक हजारावर दुचाकी गाड्यांची आज विविध शोरूम मध्ये डिलिव्हरी होत आहे. एकीकडे युद्धाचे सावट तर दुसरीकडे गॅस टंचाई असताना या सर्व गोष्टी विसरत जाऊन ग्राहक आज मोठ्या प्रमाणावर खरेदी करत विजयाची गुढी उभारत आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण दिसत आहे
