सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे आता नागपूरचे जिल्हाधिकारी झाले असून त्यांच्या ठिकाणी कोल्हापुरात झेडपीचे सीईओ म्हणून कार्यरत असणाऱ्या एस कार्तिकेयन यांची नियुक्ती झाली आहे. कार्तिकेयन यांनी आज दुपारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. सोलापुरातील प्रस्तावित आयटी पार्क उभारणे, पंढरपूर कॉरिडॉरचा प्रश्न मार्गी लावणे, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे तसेच संत नामदेव महाराज स्मारक उभारणे, बसवेश्वर स्मारक उभारणे, संत सावता माळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे, सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरील अतिक्रमणे हटवून नाईट लँडिंग सुविधा आदी अनेक कामे विविध स्टेजवर प्रलंबित असून ती मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान नव्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर असणार आहे. बार्शी, माढा, पंढरपूर जिल्ह्यातून प्रस्तावित असलेला शक्तिपीठ महामार्ग त्याचे भूसंपादन करणे शिवाय सुरत -चेन्नई या महामार्गाची भूसंपादन करणे हे देखील मोठे आव्हानात्मक काम आहे. कुमार आशीर्वाद यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला त्याचप्रमाणे आता नव्या जिल्हाधिकाऱ्यांची कार्यशैली पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा आतुरला आहे.
