सोलापूर- महापौर यांच्या कार्यालयामध्ये आज परिवहन संदर्भात बैठक घेण्यात आली.यावेळी परिवहन सभापती, कामगार संघटना व नगरसेवक यु.एन बेरिया यांनी महापौरांकडे परिवहन संदर्भात विविध अडचणी संदर्भात बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली. त्या अनुषंगाने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये उद्या होणार्या बजेट बोर्डमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांसाठी थकित असलेले पगार साठी बजेट मध्ये तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.त्यावर चर्चा करण्यात आले. त्यानुसार महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आश्वासन देत उद्याच्या बजेटमध्ये परिवहन साठी बजेट तरतूद करण्यात येईल अशी माहिती दिली. तसेच यावेळी महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी परिवहन विभाग खाजगी करण्यासंदर्भात यावेळी माहिती दिली. या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,परिवहन सभापती जय साळुंखे,महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे, माजी विरोधी पक्ष नेते महेश कोठे, नगरसेवक यु एन बेरिया, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.