येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज 60 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. आजची आकडेवारी तर चिंतेत पाडणारी आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 67,123 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. हा आकडा गुरुवारच्या तुलणेत 5 हजार 428 रुग्णांनी जास्त आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना आलेख वर जात असून रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात मृतांची संख्यासुद्धा रोज वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 419 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात एकूण 56 हजार 783 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.