महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत आज पासून गावागावात माझं गाव..आरोग्य संपन्न गाव..या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानासाठी तब्बल 80 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एक एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर बक्षीसांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. या अभियानात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषद ला पाच कोटी,दुसऱ्या क्रमांकाला तीन कोटी आणि तिसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषदेला दोन कोटी रुपये दिले जाणार आहेत.
