येस न्युज मराठी नेटवर्क : आज वैशाख पौर्णिमा. आजच्या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा तीस टक्के अधिक तेजस्वी दिसणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचे काळे ढग दूर होण्यास आणि पूर्ववत तेजस्वी जीवनमान होण्यास सुरुवात होईल, कारण सोलापूर शहरासह महाराष्ट्रातील आणि देशभरातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने बरे होऊ लागले आहेत. टेस्टिंग च्या तुलनेत 20 टक्के रुग्ण आढळणाऱ्या सोलापूरच्या ग्रामीण भागात आता बरे होण्याचे प्रमाण अधिक झाले असून अवघे दहा टक्के रुग्ण आता आढळू लागले आहेत. देशातील रुग्ण संख्येत देखील लक्षणीय घट होत असून तीन लाखांच्या वर दररोज रुग्ण आढळत होते काल एक लाख 84 हजार रुग्ण आढळले. महाराष्ट्रत देखील दररोज 70 हजार च्या आसपास रुग्ण आढळत होते ते आता चोवीस हजारच्या आसपास आले आहेत पॉझिटिव्हिटी रेट आणि डेथ रेट घटला आहे त्यामुळे आता अनेक मोठ्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन बेड रिकामे होऊ लागले आहेत. गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण दिन आजच्याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आज बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते म्हणून ही चांगली बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा यामुळेच लोकांचे मनोबल निश्चितच वाढेल ही आशा आहे