येस न्युज नेटवर्क : पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानचा एक विकेटनं पराभव केला. पाकिस्तानच्या विजयासह भारताचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये प्रत्येकी दोन दोन सामने जिंकत फायनलचं तिकिट मिळवलं आहे. अफगाणिस्तान आणि भारतीय संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघाचा आज औपचारिक सामना होणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आशिया चषकात आपेक्षित खेळ करता आला नाही. गतविजित्या भारतीय संघाला सुपर 4 फेरीत सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि अफगाणिस्तान संघाला सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. आशिया चषकात भारताला गोलंदाजी आणि फलंदाजीत सातत्य राखता आलं नाही. भारताचा मध्यक्रम अपयशी ठरला तसेच अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. तसेच क्षेत्ररक्षणातील काही चुकाही महागड्या ठरल्या. टीम इडिंयाने या चुकांमधून धडा घेणे गरजेचे आहे. अफगाणिस्तानचा पराभव करत आशिया चषकाचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानकडे आक्रमक फलंदाजांचा भरणार आहे. त्याशिवाय दर्जोदार फिरकी गोलंदाजीही त्यांची ताकद आहे. भारताविरोधात धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता अफगाणिस्तानमध्ये आहे. त्यामुळे आजचा सामना औपचारिक असला तरी अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.