सोलापूर (प्रतिनिधी)ति-हे येथील सीना नदीला पूर आल्याने येथील अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या बाधित लोकांची राहण्याची सोय आ. सुभाष देशमुख यांनी ति-हे येथील लोकमंगल बँकेच्या शाखेत केली आहे.
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने ति-हे येथील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. ही बाब आ. देशमुख यांना कळताच त्यांनी तात्काळ येथील बाधित लोकांची राहण्याची सोय तेथील लोकमंगल बँकेच्या शाखेत करत महिला भगिनींना धीर दिला आहे. मी गावातील माता-भगिनींना कधीही उघड्यावर सोडणार नाही. त्यांना कोणतीही मदत हवी असल्यास त्यांनी तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली .
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारचा एकही मंत्री अथवा प्रतिनिधी अद्यापही सोलापूर दौऱ्यावर नाही. अशा परिस्थितीत सत्ता नसतानाही आमदार सुभाष देशमुख सकाळ पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाताना दिसत आहेत. शुक्रवारीही आमदार देशमुख यांनी दक्षिण आणि उत्तर तालुक्यातील गावांचा दौरा करून येथील नागरिकांना धीर देत त्यांना तातडीची मदत उपलब्ध करून दिली आहे.