मुंबई : टिकटॉकमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे आज गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील व्हिडीओंमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या. भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. यानंतर भाजपच्या हरियाणा युनिटने त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.सोनाली फोगाट यांनी बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या 14व्या सीझनमध्ये भाग घेतला होता.