सोलापूर : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत आशा वर्कर हे सोलापूरातील विविध भागामध्ये कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सेवा बजावीत आहेत. सदर आशा वर्कर यांनी कोव्हिड-19 च्या काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा केलेली आहेत. त्यांना कोव्हिड-19 च्या काळामधील वेतन मिळाले नसल्यामुळे उदरनिर्वाह करण्याकरीता अनेक अडचणी निर्माण होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. याबाबत सदर आशा वर्कर यांनी थकित वेतन मिळावे याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती.
या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगपालिकेचे मा. आयुक्त यांना दुरध्वनीव्दारे सदर आशा वर्कर यांचे थकित वेतन मिळण्याकरीता सांगितले होते. त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आशा वर्कर यांना कोव्हिड-19 च्या काळामधील 4 महिन्यांचे थकित वेतन मिळाले. यामुळे सदर आशा वर्करमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले.