सोलापूर – महाराष्ट्र व विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वार्थाने आदर्श ठरलेली पंढरपूरची ‘स्वैरी’ संस्था आता स्वामी विवेकानंद इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, (एसव्हीआयटी), सोलापूरच्या माध्यमातून तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये रोवत सोलापुरात एका नव्या ज्ञानपर्वाचा आरंभ करीत आहे. या मध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम तसेच व्यवस्थापन व कॉम्पुटर क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम अधिकृतपणे सुरु होत असून यामुळे सोलापूरसह एकूणच परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्चशिक्षणातील उत्तमोत्तम संधींचा लाभ या महाविद्यालयात आता मिळणार आहे. ज्यायोगे ‘SVITच्या माध्यमातून स्वेरी पंढरपूरच्या ज्ञानसंस्कृतीचा आता सोलापुरात प्रवेश !’ हा उगार काढण्याची संधी अनेक विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरीक याना मिळणार आहे.
महाविद्यालयात नव्याने सुरू होणाऱ्या शाखांमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (१२० जागा), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (६० जागा), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (६० जागा), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकाम्युनिकेशन इंजिनिअरिंग (६० जागा) यासारख्या अद्ययावत व महत्वपूर्ण अभियांत्रिकी शाखांचा समावेश आहे. तसेच या महाविद्यालयात व्यवस्थापन व संगणक क्षेत्रातील एमबीए (६० जागा) व एमसीए (६० जागा) हे पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम ही सुरू करण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांची सुरवात होण्याला सर्वार्थाने कारणीभूत आहेत ते डॉ. बी. पी. रोंगे सरांचे दूरदर्शी नेतृत्व आणि ‘पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन’ या अभ्यासपद्धतीची काटेकोर व प्रभावीपणे झालेली अंमलबजावणी! डॉ. बी. पी. रोंगे सरांनी ग्रामीण भागात असलेल्या विद्यार्थ्यांची ज्ञान मिळवण्याची तळमळ लक्षात घेऊन १९९८ साली गोपाळपूरच्या माळरानांतून इंजिनिअर मित्रांना एकत्र घेऊन स्वेरीच्या माध्यमातून ज्ञानगंगा प्रवाहित केली. स्वतः खर्डी सारख्या छोट्या गावात एका शेतवस्तीवर राहून, ज्ञानसाधनेत सतत रममाण होत, त्यांनी VJTI मुंबई येथून बी. टेक, तर IIT मुंबई येथून एम. टेकचे, व पुढे पी. एचडी. शिक्षण पूर्ण केले. स्वेरीची स्थापना करून अनेक अनोखे आणि विद्यार्थीभिमुख उपक्रम, प्रयोग त्यांनी राबविले. इंजिनिअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अशा विविध विद्याशाखांची डिप्लोमा ते पी. एचडी पर्यंतची ज्ञानदालने एका छताखाली आणली, आपल्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा फक्त स्वेरी पुरता मर्यादित न देवता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि पुण्यश्नोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या अनेक धोरणात्मक जडणघडणीत सिनेट सदस्य, मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य, डीन अश्या अनेक पदांच्या माध्यमातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली व आजही अखंडपणे त्याच ऊर्जेने ते शिक्षणक्षेत्राला अधिकाधिक गतिमान व विद्यार्थीभिमुख करण्यासाठी कार्यरत आहेत. विशेष आनंदाची बाब म्हणजे नव्या उमेदीचे, शिक्षण क्षेत्रातील आश्वासक युवा नेतृत्व स्वेरीचे नूतन सचिव व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. सुरज रोंगे यांचे मार्गदर्शन या संस्थेला ‘सहसचिव’ या नात्याने लाभणार असून स्वेरीचे अध्यक्ष व प्रतिथयश अभियंते, उद्योगपती श्री. अशोक भोसले हे सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेत या संस्थेचे सचिव म्हणून हिरीरीने सहभागी आहेत. प्रा. रोंगे सरांच्या नेतृत्वाखाली, अत्यंत समर्पित शिक्षकवृंद व उत्साही विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून महाविद्यालयाच्या प्रगतीस नवी दिशा लाभेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्वेरीच्या व्यवस्थापनाने SVIT चे नियंत्रण घेतल्या नंतर, या महाविद्यालयाने गेल्या तीन वर्षात डिप्लोमा अभ्यासक्रमाद्वारे संपूर्ण प्रवेश व उत्कृष्ठ निकाल असा उत्तम शैक्षणिक ट्रॅक रेकॉर्ड निर्माण केला आहे. डिप्लोमा सोबत येथे आयटीआय सुद्धा कार्यरत असून इलेक्ट्रिशियन फिटर व डिझेल मेकॅनिक यासारखे व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू आहेत. ही संस्था आज गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षण, वेळेचे काटेकोर नियोजन, आदरयुक्त शिस्त व प्रभावी ज्ञानसंस्कृती या बाबीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी ओळखली जाऊ लागली आहे. मोबाईल मुक्त व अभ्यासाभिमुख शिक्षण संस्कृती, अत्याधुनिक संगणक व तांत्रिक प्रयोगशाळा, इंग्रजी संभाषण व व्यक्तिमत्व विकासासाठी उत्तम उपक्रम, स्वच्छ व सुरक्षित होस्टेल, व स्वेरीच्या सहकार्यातून प्रशिक्षण व नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी इंडस्ट्री कनेक्ट ही संस्थेची विशेष वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी भिमुख प्राचार्य डॉ. यु.एस. सुतार यांचे नेतृत्व व प्रा. कीर्ती भोसले यांचे सक्षम कॅम्पस व्यवस्थापन देखील महाविद्यालास लाभले आहे. हि टीम SVIT मध्ये केवळ शिक्षण नव्हे तर संस्कार, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा स्वेरीने दिलेला वारसा जपत आहे. SVIT महाविद्यालय म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा दीपस्तंभ बनत आहे. यापूर्वीहि सोलापूरच्या अनेक पालकांनी आपल्या पाल्याचा स्वेरीमध्ये प्रवेश घेतला होता. तेंव्हापासूनच अनेक पालक डॉ. रोंगे सरांना सोलापूरमध्ये महाविद्यालय सुरु करावे यासाठी विनंती करत होते.
योगायोगाने सोलापुरात मिळालेले SVIT डिप्लोमा कॉलेज उत्तम पद्धतीने कार्यरत केल्यानंतर अनेक पालकांनी आता इंजिअरिंगचे डिग्री कॉलेज सुरु करा असा एकसारखा हट्टच जणू डॉ. रोगे सरांकडे धरला. पालकांचा अतूट विश्वास आणि विद्यार्थ्यांची ज्ञानसाधनेवर असणारी श्रद्धा या संयोगातून आता अनेकांचे स्वप्न या महाविद्यालयाच्या रूपाने साकार होताना दिसत आहेत. खेड येथे पूर्वीपासून सुरू असलेल्या डिप्लोमा कॉलेजला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आता पदवी अभ्यासक्रमांची मागणी ही स्वाभाविक होती. पारंपारिक इंजिनिअरिंग शिक्षण पद्धतीला छेद देणारी आणि ग्रामीण भागात स्वतःचे उर्जावान, प्रयोगशील, नावीन्यतापूर्ण उपक्रमांचा आपल्या शिक्षणपद्धतीत समावेश करणारे शैक्षणिक केंद्र देणारी पंढरपूरची स्वेरी संस्था आज SVIT महाविद्यालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या नकाशावर ज्ञानक्षेत्रात एक ठळक ओळख निर्माण करत आहे. SVIT हे केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातील हुशार विद्यार्थी घडविणारे फक्त महाविद्यालय न राहता ती एक प्रभावी शिक्षण चळवळ बनत आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण, पालक आणि विद्यार्थ्यांचा अढळ विश्वास, आदरयुक्त शिस्तीवर आधारलेली संस्कृती, आधुनिक तंत्रकौशल्य आणि रोजगारतेचा संगम म्हणजे स्वेरी, स्वेरीची तीच गुणवत्ता, तीच संस्कृती आणि त्याच सुविधा आज सोलापुरात SVIT च्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे, ज्यायोगे आज सोलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांचे स्वप्न SVIT च्या माध्यमातून साकारण्याची संधी निर्माण झाली आहे.
या वेळी पत्रकात परिषदेस संस्थेचे ‘सहसचिव प्रा. सुरज रोंगे, उद्योगपती अशोक भोसले, प्राचार्य डॉ. यु.एस. सुतार, प्राचार्य. कीर्ती भोसले आदी प्रद्यापक उपस्थिती होते..