येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मोहोळ पोलिसांच्या मदतीने मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील नागनाथ मंदिर चंदन विक्री करणाऱ्या तिघांना अटक करून ते 20 किलो चंदन मोटरसायकल तराजू आणि कुदळ असा जवळपास दोन लाख 85 हजार यांचा ऐवज जप्त केला आहे .चंदन विक्री प्रकरणात रमेश चौरे ,लंकेश्वर काळे आणि अमोल काळे या पेनुर येथील तिघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.