सोलापूर : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग चालू असताना एमआयडीसी येथील केकडे नगर येथे सचिन ईरप्पा धोत्रे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मोटारसायकल जप्त करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी अधिक चौकशी केली असता सचिन धोत्रे याच्याकडे 26 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले . तसेच तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
एमआयडीसी पोलीस स्टेशन, जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटारसायकल याबाबत तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे सचिन धोत्रे याने मुळेगाव रोड वरील गणेश नगर , शांती नगर येथील बंद घर आणि कुमठा नाका येथील स्वागत नगर येथील घराचे दरवाजे तोडून दागिने चोरल्या बाबत कबुली दिली आहे. दागिने विकण्यासाठी सचिन धोत्रे सराफ बाजार येथे येणार असल्याचे समजल्यानंतर सापळा लावण्यात आला होता. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस अमलदार बाबर कोतवाल, विनायक बर्डे, संदीप जावळे , विजय वाळके आदींनी केली आहे.