सोलापूर । सोलापूर शहरातील अंबिका नगरात 1 फेब्रुवारी रोजी रूपा भास्कर शिंदे या पन्नास वर्षीय महिलेचा गळा दाबून खून करून सोन्याचे दागिने चोरल्याच्या प्रकरणाचा दीड महिन्यानंतर तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे .या खुनातील आरोपी अमित अली रियाज चौकी, मुजम्मिल अहमद चौकी दोघेही राहणार नई जिंदगी परिसर तसेच संजय गुजले राहणार मोदीखाना शिवाजीनगर सोलापूर या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या तीनही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक संजय पवार ,कमलाकर ताकवले यांच्या पथकाने याचा तपास लावला आहे
