सोलापूर : व्यवसाय करण्यासाठी दोन लाख रुपये पाच टक्के व्याजाने घेतले होते. मात्र व्याज देण्यास उशीर झाल्यामुळे शिवीगाळ करून धमकावल्याची फिर्याद ईश्वर रामनाथ मोरे याने सलगर वस्ती पोलिस ठाण्यात केली आहे. डोणगाव रस्त्यावरील साठे शिंदे वस्तीत हा प्रकार २० मे ते १० जूनदरम्यान वारंवार घडला आहे. राजू गायकवाड , समर्थ गायकवाड या सेटलमेंट फ्री कॉलनीतील दोघांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.