सोलापूर :- दिनांक 27 जुलै रविवार रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे अस्तित्व मेकर फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी प्रमाणे प्रायोजिक रंगभूमीवर सातत्याने आणि समर्पणाने कार्य करणाऱ्या प्रतिभावान काम करण्यऱ्या व ज्यांनी उत्तम अभिनय ,संवादलेखन, दिग्दर्शन आणि नाट्य संवेदनशीलतेच्या प्रत्येक क्षेत्रात ज्यांनी आपली स्वतंत्र छाप सोडली आहे. अशा डॉ. दिलीप घारे यांना यावर्षीचा राज्यस्तरीय रंगसाधक पुरस्कार जाहीर झाला आहे.असे अस्तित्व मेकर चे सचिव किरण लोंढे यांनी कळविले आहे
या प्रसंगी पुरस्कार महोत्सवाचे अध्यक्ष मा. संजय सावंत, प्रमुख पाहूणे म्हणून हास्य जत्रा चे दिग्दर्शक मा.सचिन गोस्वामी,सिने अभिनेते सचिन गावडे, प्रवीण डाळिंबकर,प्रमुख संयोजक ॲड. मा.बसवराज सलगर, उपनगरीय नाटय परिषदे चे अध्यक्ष मा. विजय सांळूखे,अस्तित्व मेकरफाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून याचे स्वरूप 11000 रू रोख रक्कम, सन्मान चिन्ह,मानपत्र व सोलापूरी वस्तूचे बकेट असे असणार आहे. हा रंगसाधक पुरस्कार निवडण्यासाठी सोलापुरातील ज्येष्ठ रंगकर्मी मा. सुमित फुलमामडी, मा.गोवर्धन कमटम व मा. बसवराज सलगर यांनी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
उत्तम अभिनय, संवादलेखन, दिग्दर्शन आणि नाट्य संवेदनशीलतेच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र आणि लक्षवेधी छाप पाडली आहे.त्यांची गाजराची पुंगी, ( ७५० प्रयोग ), वाजली रे वाजली (५० प्रयोग ) ही नाट्यकृती विशेष गाजली.
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधु इथे चोघी तिथे, सासू नंबरी जावई दस नंबरी, मरेपर्यंत फाशी, कायद्याचं बोला, असे मराठी चित्रपट आणि अलीकडील पोस्ट ऑफिस उघडं आहे (मकरंद अनासपुरे, समीर चौघुले यांच्यासोबत) या मालिकेतूनही त्यांनी दर्जेदार अभिनय सादर केला आहे.
.या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी चार सिनेनाट्य अभिनेते उपस्थित राहणार असल्याने सोलापुरातील जास्तीत जास्त नाट्यप्रेमीनी उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे अध्यक्ष मा. संजय सावंत, प्रमुख संयोजक मा.बसवराज सलगर व आस्तित्व मेकर फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी केले आहे.