- शिवजयंती घराघरात साजरी करण्याचे आवाहन
सोलापूर : शिवजयंती निमित्त यंदा थोरला मंगळवेढा तालिमतर्फे शिव सजावट स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे आधारस्तम व विरोधी पक्षनेता अमोलबापु शिंदे आणि संकेतभाऊ पिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नववर्षाच्या आगमनाबरोबरच तमाम शिवप्रेमींच्या मनात शिवजन्मोत्सवाचे वेध लागतात . जन्मोत्सव म्हणजे शिवविचारांचा , शिवचरित्राचा जागर तमाम शिवप्रेमींच्या मनात घोंगावत असतो . आपापल्या मंडळांच्या देखावे, मिरवणुका , मर्दानी डायांचे प्रात्यक्षिके , विविध स्पर्धा , उपक्रम , या मध्ये तन – मन – धनांनी शिवप्रेमी गुतलेला असतो . लहानांपासून थोरांपर्यंत सर्व जाती – धर्माच्या कक्षा ओलांडून शिवप्रेमी शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो .
कै.बाळासाहेब ( आण्णासाहेब शिंदे , कै . शिवाजीराव ( महाराज ) पिसे यांनी थोरला मंगळवेढा तालिमच्या माध्यमातून आजवर अनेक गौरवास्पद सामाजिक कार्यक्रम राबविले आहेत . त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या विचारांचा वारसा जपत पुढील पिढी कार्यरत आहे . दरवर्षी शिवजयंती उत्सव काळात थोरला मंगळवेढा तालिमतर्फे मिरवणुकीत सहभागी अधिकारी , कर्मचारी , आणि परगावचे शिवभक्त यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजनाचे नियोजन केले जाते . तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात . यंदा मात्र कोविडमुळे शिवजन्मोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करता येणार नाही . या उत्सवावर निबंध आल्याने अमोल ( बापु ) शिंदे , संकेत ( भाऊ ) पिसे , प्रताप ( भाऊ ) चव्हाण , अनिकेत पिसे , प्रकाश अवस्थी , सुनिल शेळके , सदानंद येलूरे , सागर पिसे , पृथ्वीराज दिक्षीत , दत्तात्रय मेनकुदळे , दत्ता खुर्द आदी थोरला मंगळवेढा तालिमच्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन विचार – विनिमय करुन शिव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
घर बसल्या शिवप्रेमींना श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता यावी व त्यांचे जीवनचरित्र समजून घेता यावे , त्यांनी केलेल्या कार्याचा नवीन पिढीला परिचय व्हावा , तसेच त्यांच्या कल्पकतेला आणि सृजनशिलतेला वाव मिळावा , यासाठी थोरला मंगळवेढा तालिम संघा तर्फे शिव सजावट स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली आहे . गौरी – गणपतीच्या उत्सवाप्रमाणे घरामध्ये शिवप्रतिमा अथवा मूर्तीची स्थापना करुन त्या समोर शिवकालीन ऐतिहासिक घटनांचे देखावे व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील कार्य , प्रसंग अथवा घटना या विषयावर आधारित सजावट करावयाची आहे . सदरची सजावट स्पर्धा ही गुरुवार , दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ ते २१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान संपन्न होणार आहे .
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक २१,००० , व्दितीय पारितोषिक १५,००० , तृतीय पारितोषिक ११,००० तसेच २,००० रोख रकमेचे दहा उत्तेजनार्थ पारितोषिके , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे . तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहे . तरी या स्पर्धेत शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे . नियम व अटी : – ( १ ) सदरहू स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे . ( २ ) या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे . ( ३ ) स्पर्धेत नांव नोंदणी करणेसाठी ९ ८२२७५०१५७ , ९ ३७०४११४२२ , ८६५२७१५३७५ , या क्रमांकावर संपर्क साधावा . ( ४ ) सदरची स्पर्धा ही विनामुल्य असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात – धर्म – लिंग – वय यांची अट नाही . ( ५ ) स्पर्धेचे कार्यक्षेत्र सोलापूर शहर परिसर आहे . ( ६ ) स्पर्धकांनी त्यांचा देखावा हा मोबाईलमध्ये चित्रित करुन संयोजकांनी दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे . ( ७ ) अंतीम फेरीत आलेल्या स्पर्धकांकडे परिक्षक स्वतः समक्ष भेट देऊन पाहणी करतील . तो पर्यंत आपले देखावे / कलाकृती / सजावट आहे त्याच स्थितीत ठेवणे बंधनकारक आहे . ( ८ ) परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील .