येस न्युज नेटवर्क : जगभरातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांचा काही दिवसांपासून घोषणा होत आहे. त्यामुळे, यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला असून निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेनं मोठं काम केलंय. अखिल विश्व अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था जे कार्य करते, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.
या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे. आता शांततेच्या नोबेल पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी (Japan) संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.