आपण ज्या समाजात जन्मलो आणि ज्या समाजात मोठे झालो त्या समाजाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी सोलापुरात श्री सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज सेवा मंडळ अर्थात सावजी समाजाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजातील गुणवंत मुलांना 51 सायकली वाटप करण्यात आल्या.
शुक्रवारी सकाळी सहस्रार्जुन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एडवोकेट उमेश मराठे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
तत्पूर्वी सकाळी ज्येष्ठ समाजसेवक भालचंद्र मेंगजी यांच्या हस्ते सहस्त्रार्जून मंगल कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. सायकल वितरण सोहळ्यासाठी समाजातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री सोमवंशीय क्षत्रिय समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवप्रकाश चव्हाण, सचिव सुनील पवार, माजी आमदार नरसिंह मेंगजी, नित्यानंद दर्बी, गिरीश दर्बी, घनश्याम चव्हाण नारायण काटवे,संजय बुरबुरे,चंदन चव्हाण, भारत बुरबुरे,कृष्णात दलबंजन, किरण पवार,सुहास मेंगजी,संतोष कमलापुरे,मोहन बारड, संतोष बुरबुरे,राहुल पवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ज्या गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या त्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.


