दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तसेच सोलापूर शहरात गेल्या पाच दिवसापासून दररोज रात्री मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तुळजापूर पासून, ऊळे कासेगाव, कासेगाव , तामलवाडी बोरामणी वडजी या भागातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी दहिटणे शेळगी मार्गे सोलापूरच्या ओढ्यामध्ये येऊ लागले आहे. यामुळेच आज सकाळी कृपाभवानी स्मशानभूमी जवळ सोलापूर तुळजापूर महामार्गावर गेल्या वीस वर्षात प्रथमच पाणी आले. घाण पाण्याचा बाळे ओढा आणि आदीला नदी दुतडी भरून वाहू लागली आहे. या पाण्याचा अवंती नगरच्या काही भागाला खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. यातून आणखी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी येणार आहे त्यामुळे बाळे स्मशानभूमी अवंतीनगर भागातून ओढ्याच्या अवतीभोवती असलेल्या अनेक नगरांना या पाण्याचा फटका बसणार आहे सध्या काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. या भागात नाल्याच्या कडेला झालेले अतिक्रमण आणि महापालिकेने नाला खोलीकरण व रुंदीकरण न केल्यामुळे या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचणार आहे तसेच स्पर्श हॉस्पिटल पासून ये जा करणे देखील बंद होण्याची शक्यता आहे
