सोलापूर : जाती-पातीच्या सीमा तोडून निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी उपलप मंगल कार्यालयातून मंगळवेढ्याकडे प्रस्थान ठेवले. देगाव रोडवरील भैरुरतन दमाणी अंध शाळेत काहीवेळ विसावा घेतलेल्या सोहळ्याचे अंध विद्यार्थ्यांनी स्वागत केले. तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख तसेच तिरे येथील राम जाधव यांनीही गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.
यंदा प्रथमच या पालखीसोबत पाच तासांत १३ किलोमीटर चालून ‘डोळस भक्ती’ सोलापूरकरांपुढे ठेवली. दिंडीने तिन्ह्यात विसावा घेतल्यानंतर हे विद्यार्थी बसने शाळेत परतले गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी सकाळी सहा वाजता देगाव रोडच्या दिशेने प्रस्थान झाले.
परिसराला जत्रेचे स्वरूप
भैरुरतन दमाणी अंध शाळा परिसराला जणू जत्रेचे स्वरूप आले. या परिसरात नारळ, हार-फुले विक्रेत्यांचेही स्टॉल लागले. याशिवाय फुगे अनु खेळण्यांची दुकानेही लागली होती. दुपारी १:१५ वाजता दिंडीने तिह्याकडे प्रस्थान करताच ही गर्दी ओसरली.