येस न्युज मराठी नेटवर्क : नव्या 2021 या वर्षातील आज पहिला दिवस .या वर्षात आज पासून काय काय बदल झाले आहेत हे प्रमुख बद्दल आपण जाणून घेऊयात या विशेष बातमी च्या माध्यमातून .कोरोना लसीची घोषणा आज होण्याची शक्यता असून देशभरात उद्या या भल्यामोठ्या लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम होणार आहे .वैयक्तिक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 10 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली असून ज्या ऑडिटेड फर्म आहेत त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.मुद्रांक शुल्क मध्ये कालपर्यंत तीन टक्के एवढी सवलत राज्य शासनाने दिली होती आता ती दोन टक्के सवलत राहणार आहे. एमपीएससीची स्पर्धापरीक्षा देणाऱ्या खुल्या गटातील तरुणांना आता सहा परीक्षा देता येतील तर मागासवर्गीय तरुणांना या परीक्षेची 9 वेळा संधी देण्यात येणार आहे .या नव्या वर्षात दर महिन्याला जीएसटी रिटर्न भरण्या ऐवजी दर तीन महिन्यातून एकदाच म्हणजे चारच रिटर्न भरावे लागणार आहेत. या नवीन वर्षासाठी सोलापूर करांसाठी सोलापूर- विजापूर, सोलापूर -अक्कलकोट, सोलापूर- सांगली आणि मोहोळ पासून पंढरपूर ते सातारा पर्यंत नवे चौपदरीकरणाने सजलेले महामार्ग वापरण्यासाठी मिळणार आहेत. सर्व राष्ट्रीय महामार्गांवर तसेच एमएसआरडीसीने केलेल्या रस्त्यांवर आता वाहनांना फास्टट्रॅक बंधनकारक करण्यात आला आहे फक्त 15 जानेवारीपर्यंत टोलनाक्यावर कॅश लेन असेल स. त्यानंतर मात्र फास्टट्रॅग नसलेल्या वाहनांना टोल नाक्यावरून जाता येणार नाही. सोलापूर शहरातील उजनी ते सोलापूर ही जलवाहिनी याच वर्षात पूर्ण होईल तसेच सोलापुरातील संभाजी तलाव नागरिकांसाठी एक पर्यटन स्थळ म्हणून याच वर्षात विकसित होईल. सोलापुरातील सिद्धेश्वर तलाव परिसर आणि पार्क मैदान देखील याच वर्षात नागरिकांसाठी खुले होईल. स्मार्ट सिटीतील बहुतांश कामे या वर्षभरात पूर्ण होणार असून 2021 हे वर्ष नक्कीच सोलापूर करांसाठी लाभदायक ठरेल मात्र विमानसेवा कधी सुरू होईल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे