बाळा तुला साखर हाय गोळी घेतलं का रे जीवाला जप बरं… आईची आर्त विनवणी…
सोलापूर दिनांक – काल मध्य रात्री 5 नोव्हेंबर रोजी अचानक धो धो पाऊस सुरू झाला उपोषणकर्ते कॉ.लक्ष्मण माळी व शहाबुद्दीन शेख त्या धो धो पावसात भिजत राहिले पण त्या ठिकाणाहून दुसरीकडे कुठे गेले नाहीत. हाकेच्या अंतरावर एम.आय. डी.सी.पोलीस ठाणे आहे. उपोषण ठिकाणीच ठाम बसले. गेल्या चार दिवसांपासन ते अन्नत्याग आंदोलन करत आहेत. यंत्रमाग कामगारांना बोनस मिळवून देण्यासाठी आम्ही जीवाची पर्वा करणार नाही. वादळ,वारा,पाऊस आमच्यासाठी नवीन नाही.माणुसकी शून्य कारखानदार आमचा अंत पाहत आहेत. आमचे बेमुदत आमरण उपोषण कायम राहील एक इंच ही मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन ची असल्याचे सांगितले.पोलीसांनी आग्रह केला की चला आपण पोलीस ठाण्यात मुक्काम करावे पण त्यांनी ते नाकारले.
काल रात्री पाऊस पडल्याने सकाळी आपला मुलगा बुवा जॉबर लक्ष्मण माळी यांना भेटायला त्यांची आई पार्वतीबाई उपोषण ठिकाणी आल्या मुलाची खालावत असलेली प्रकृती पाहून भावनाविवश होवून रडल्या. आणि म्हणाल्या “अरे लक्ष्मणा , बाळा तुला साखर हाय गोळी घेतलं का रे जीवाला जप बरं…” आईने आर्त विनवणी केली. त्यावर बुवा जॉबर म्हणाले “अग आई मला काही होत नाही निर्णय होईल, कामगार आमच्या सोबत आहेत, आडम मास्तर माझी काळजी घेत आहेत.”
हे दोन्ही लढाऊ कार्यकर्ते वयाचे साठी पार केलेले आहेत.यामध्ये लक्ष्मण माळी बुवा जॉबर हे मधुमेह रुग्ण आहेत.यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कामगारांच्या प्रति लाल बावट्याची बांधिलकी कायम राखली आहे.