सोलापूर दिनांक – महाराष्ट्रातील लक्षवेधी मतदार संघातील 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मी माझी शेवटची निवडणूक लढवित असून मला आबालवृद्धांच्या सहकार्याची,आशीर्वादाची नितांत गरज आहे.माझी ही शेवटची निवडणूक असल्यामुळे समाजातील सर्व थरातील सर्व समाज बांधव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.याचा प्रचंड अभिमान आहे. विविध मंडळे,सामाजिक संस्था आदींचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. तळागाळातील सरसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझे आयुष्य समर्पित केले आहे. आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा वज्र निर्धार करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी कोयता हातोडा तारा या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आता एकच ध्यास शहर मध्य चा विकास असे भावनिक साद ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी घातले.
रविवारी २४९ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रचारार्थ आंध्र दत्त चौक दाजी गणपती येथे भव्य जाहीर सभा कॉ.व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सुरुवातीला प्रजा नाट्य मंडळाचे कलावंत तेलुगु मराठी हिंदी भाषेत लोकगीते व चळवळीतील गीते सादर करून वातावरणात स्फूल्लिंग चेतावले.
यावेळी बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसवणारे महाराष्ट्रातील अलीबाबा चालीस चोर शिंदे फडणवीस – सरकार यांना पायउतार करण्यासाठी आडम मास्तर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले.
तत्पूर्वी यावेळी बोलताना माजी नगरसेविका कॉ.नसीमा शेख म्हणाल्या की, आज काँग्रेस पक्षाच्या तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या जाहीर सभेला लोकांना 300 रुपये देऊन खुर्च्या भरले. जनतेसाठी काम केले असते तर ही वेळ आली नसती अशी जोरदार टीका करताना लाल बावट्याचे संघर्षाच्या जोरावर जनता एकत्र आणतात.ही एकी येत्या 20 तारखेला मतदानाच्या रूपाने दाखवून देतील.
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका नसीमा शेख, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कॉ.मुरलीधर सुंचू,दिनेश अण्णा घोडके,निलेश शिंदे, मनीष चव्हाण अशोक बल्ला, आदींची उपस्थिती होती.
या सभेचे सूत्रसंचालन व आभार ॲड अनिल वासम यांनी केले.