सोलापूर : महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरातील अकरा हॉटेल्स व लॉज ना स्वखर्चाने क्वारंटाईन होणाऱ्यासाठी रूम्स देण्यास परवानगी दिली आहे. सोलापूर हॉटेल असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे विनंती करून हॉटेलमध्ये qwarantine होणाऱ्यांसाठी अकरा हॉटेल्स उपलब्ध असल्याचे कळवले होते. त्यानुसार आयुक्त पी. शिवशंकर यांनी या सर्व हॉटेल व लॉजेसना कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून स्वखर्चाने qwarantine होणाऱ्या रुग्णांना सेवा देण्यासाठी परवानगी दिली आहे.