सोलापूर : केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या आवारात आवारातील बँडरूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून आठ मे ते बारा जून या दरम्यान सहा हजार रुपयांचे साहित्य चोरी करून नेले आहे. या साहित्यामध्ये सेक्सोफोनचे दोन नग, ईनिफोनीयम वाद्याचे मोठ्या आकाराचे दोन आणि मध्यम आकाराचे दोन नग ,इन्वर्टर बॅटरी , रॉकेट कंपनीचे चार्जेबल बॅटरी, स्टीलचे बिगुल असे साहित्य असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रकाश पांडुरंग गायकवाड यांनी याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर मंदुरकर तपास करीत आहेत.