येस न्युज मराठी नेटवर्क ; दहिटणे येथील कमलनगर मधील अमीन अस्मोददिन शेख यांच्या बंद घराचे कुलूप तोडून १८ मे रोजी दुपारी २ ते १९ मे रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने रोख ४८,००० रुपये आणि तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स असा ५७,००० रुपयांचा माल चोरून नेला आहे. शेख यांनी याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस नाईक जाधव अधिक तपास करीत आहेत.