सोलापूर : बिराजदार हॉस्पिटल जवळील तोरणा बंगला येथे सचिन शंकरराव ठोकळ यांच्या मालकीच्या जागेत विहिरीतील मोटर काढून मोटारचे प्लास्टिक पाय तोडून अंदाजे पंधराशे रुपयांचे नुकसान केले. तसेच मोटारी करिता लावलेल्या विविध वस्तू चोरून नेल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात सचिन ठोकळ यांनी केली आहे. शिवाजीनगर भागात राहणाऱ्या उद्धव घोडके, मनोज घोडके ,विशाल घोडके आणि अनिल राजपूत या चौघांविरुद्ध सचिन ठोकळ यांनी संशय व्यक्त केला असून फौजदार चावडी पोलिस तपास करीत आहेत.