शेळगी : येथील कृषि भवन परिसरात शेळगी चरण्यासाठी नेली असता १४ जून रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेळी चोरून नेल्याची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . शेळगी भागातील भीम नगर येथे राहणाऱ्या लायप्पा शेटीबा उबाळे यांनी आपली ५ हजार रुपयांची काळ्या रंगाची शेळी चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी शेळगी भागातून काळ्या रंगाच्या बोकड चोरीस गेला होता. पोलीस नाईक पाटील अधिक तपास करीत आहेत.