माझ्या मुलामुलींना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असताना, माझ्या मुलांना आरक्षण नसल्यामुळे भविष्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका ३९ वर्षीय तरुणाने शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे उघडकीस आली.
दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की,विजय पुंडलिक राकडे रा. खामगाव (गोरक्ष) फुलंब्री असं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य मध्ये गाजत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तरुणाने शिवरायांच्या पुतळ्यासमोर विषारी औषध प्राशन करून स्वतःचे आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एका चिठ्ठीवर मजकूर लिहिला होता. नातेवाईक व पोलिसांच्या हाती चिठ्ठी लागल्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यामध्ये लिहिलं होतं की, माझ्या मुलांना मुलींना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असताना माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यासाठी मी काही करू शकत नाही.