भैरवनाथाच्या नावानं चांगभलं चा जयघोष
अक्षदा सोहळा, कावडींसह पालखी, छबिना, शोभेचे दारूकाम
सोलापूर, दि. 23 एप्रिल – हजारो भक्तगणांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र अंकोली भैरवनाथ यात्रा (ता. मोहोळ) उत्सव मोठ्या भक्तीमय व धार्मिक वातावरणा पार पडला. 20 ते 23 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या यात्रास उत्सवा देवाचा विवाह सोहळा, कावडींसह पालखी, छबिना व शोभेचे दारूकाम असे कार्यक्रम झाले असल्याचे मंदीर समितीच्यावतीने सांगण्यात आले.
श्री क्षेत्र अंकोली भैरवनाथ हे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील हजारों भक्तगणांचे कुलदैवत आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात श्री भैरवनाथ यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्यावर्षी हा यात्रा उत्सव 20 ते 23 एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र अंकोली भैरवनाथ यात्रेत 20 एप्रिल रोजी रात्री 10 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत श्री जागर होऊन पहाटे 5 वाजता श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळ्यातील अक्षदा पार पडल्ाय. त्यानंतर महाआरती झाली.
21 एप्रिल रोजी सोमवारी गावकऱ्यांची अष्टमी दिवशी नाल बसवणे तसेच दुपारी 4 वाजता मानाच्या कावडींसह आरत्या निघाल्या. रात्री सवाद्य पालखी छबिना निघाला. 21, 22 आणि 23 एप्रिल या तिन्ही दिवशी पालखी छबिना निघाला. यावेळी यात्रेसाठी आलेल्या हजारो भक्तगाणांनी पालखीला खांदा देत कावडी नाचविल्या. बुधवारी 23 एप्रिल रोजी पालखी छबिना सोहळ्यात शोभेचे दारूकाम होऊन यात्रेचा समारोप झाला. या यात्रा उत्सवासाठी मंदीर समिती तसेच गावकऱ्यांकडून येणाऱ्या भक्तगणांच्या सोयी-सुविधांसाठी परिश्रम घेण्यात आले.