शेळगी गावठाण येथील देशाभिमान सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आली कॉर्नर बैठक
सोलापूर : सहा वर्षांपूर्वीपासून तीन वेळा उद्घाटन केलेले सोलापूर शहरवासीयांना अस्व आयटी पार्क गाजर दाखवून दिशाभूल करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. पंधरा वर्षपासून या मतदारसंघातील नागरिकांना एकदाही तोंड न दाखवता थेट विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी सोलापूरकरांना खोटी स्वप्ने दाखवून फसवण्याचे काम विरोधी उमेदवार करत आहेत. नागरिकांनी मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवावे असे हवामान आमदार विजयकुमार देशमुख यांनी शेळगी गावठाण येथील देशाभिमान सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या कॉर्नर बैठकीत केले.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, बसवराज इटकळे, प्रकाश जाधव, विश्वनाथ होसाळे, नागनाथ जावळे, जयश्री धप्पाधुळे, सोमनाथ रगबले, वीरेश उंबरजे, सूर्यकांत रमणशेट्टी, अनिल छत्रबंद, गंगाधर झुरळे आदी मान्यवर उपस्थित होते..
पुढे बोलताना महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख म्हणाले की केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी संपूर्ण शहर उत्तर मध्ये आपल्या वतीने राबविण्यात आले आहेत. विरोधकांनी एक रुपयाचा विकास कामे केले नाहीत. ३५ वर्ष महानगरपालिकेच्या सत्तेत राहून महापालिकेला चुना कोणी लावला हे आपण जनतेला माहीतच आहे. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवून जनतेला धोका दिला. याचा जाब आपण येणाऱ्या निवडणुकीत मतदानातून व्यक्त करावा असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केले…
शेळगी ,दहिटणे,मित्र नगर या संपूर्ण परिसरात पंधरा वर्षांपूर्वीची परिस्थिती अत्यंत वाईट होते. आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंत्री पदाच्या माध्यमातून अनेक सोयी सुविधा या भागात दिल्या. त्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे. स्वच्छ चरित्राचे विजयकुमार देशमुख यांच्या मागे नागरिकांनी उभे राहावे मतदानातून पाठबळ द्यावे असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी केले.
दिलेला शब्द पूर्ण करणारे एकमेव राजकारणी म्हणजे विजयकुमार देशमुख आहेत. विरोधक आरोप करतात काय काम केलेत ? काम न करता चार वेळा निवडून कसे आले ? तुम्ही काम करून एकदाही का बर निवडून आला नाहीत ? आमच्या मित्रपरिवार च्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने आमदार देशमुख यांच्या मागे या भागातील जनता असणार असल्याचे आश्वासन सिद्धाराम नागशेट्टी यांनी दिले….
या कॉर्नर बैठकीत शेळगी गावठाण भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते….