रयत शिक्षण संकुलाच्या वतीने कर्मवीरांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रतिपादन..
सोलापूर- कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलां मुलींच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षणाचा मंत्र दिला. कमवा व शिका योजना कार्यान्वित केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले. त्यातून ग्रामीण भागातील जनजीवनाचे चित्र पालटले. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती झाली असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केले.

सोलापूर महानगरपालिका व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, रावजी सखाराम हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, प्राथमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त सम्राट चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे,मनपा उपायुक्त तैमूर मुलाणी, आनंद चंदनशिवे, उद्योजक केतनभाई शहा, लक्ष्मी उद्योग समूहाच्या सौ माधुरी पाटील, प्रख्यात करसल्लागार धीरज जवळकर, राजकीय विश्लेषक डॉ श्रीकांत येळेगावकर, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे,ओम प्रकाश वाघमारे, अंत्रोळीकर, डॉ अस्मिता बालगावकर, मुख्याध्यापीका काशीबाई पुजारी, मुख्याध्यापक संजय जोशी, वसंत नागणे, इतिहास संशोधक नितीन अणवेकर, प्रा उत्तमराव हुंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे डॉ सचिन ओम्बासे म्हणाले की कर्मवीरांनी आपल्या संस्थेच्या वस्तीगृहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था केली. कठीण प्रसंगी वस्तीगृहातील मुलांच्या भोजन खर्चासाठी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र देखील मोडले. दोघांनीही त्यागाचा आदर्श घालून दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वालवडकर यांनी केले सूत्रसंचलन वंदना डांगे यांनी केले तर आभार अमर देशमुख यांनी मानले.कार्यक्रम प्रसंगी योगासन राष्ट्रीय खेळाडू जानवी चंदनशिवे व तायक्वांदो खेळाडू दिव्या कोणे व प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.
कर्मवीरच आधुनिक भगीरथ- डॉ श्रीकांत अंधारे
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविली. त्यामुळे गरीब मुला मुलींना शिक्षण मिळाले. महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिक क्रांती झाली. म्हणून वंचित व उपेक्षित घटकांना शिक्षणाची द्वारे खुली करणारे ते आधुनिक भगीरथ आहेत. असे गौरवोद्गार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी काढले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना आयुक्त डॉ सचिन ओम्बासे, डॉ श्रीकांत अंधारे, डॉ अतुल लकडे, मनपा उपायुक्त तैमूर मुलाणी,आनंद चंदनशिवे व मान्यवर.