भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच पार पडलेला अंडर-19 महिला T20 विश्वचषक भारतीय संघानं जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या ) इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं विजय मिळवला. आता हा सामना जिंकल्यानंतर भारताच्या अंडर 19 महिला संघाने जबरदस्त सेलिब्रेशन केले.
‘काला चष्मा’वर थिरकला भारतीय महिला क्रिकेट संघ
अंडर 19 महिला टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघानं जोरदार सेलिब्रेशन केले. त्यांच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ नुकताच आयसीसीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये अंडर 19 भारतीय महिला क्रिकेट संघ हा कतरिना कैफच्या काला चष्मा या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओवर ‘न्यू काला चष्मा चॅम्पियन्स’ असं लिहिलेलं दिसत आहे. या व्हिडीओमधील महिला क्रिकेटर्सच्या डान्स स्टेप्सनं अनेकांचे लक्ष वेधले. क्रिकेट प्रेमींनी या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन या भारतीय महिला क्रिकेट संघाचं कौतुक केलं आहे. तसेच, अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.