मुंबई : रवी राणा यांना राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. रवी राणा यांच्या निमित्ताने रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले,” असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले असून अप्रत्यक्षपणे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला होता. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते.