सोलापूर : शहरालगत असलेल्या संभाजी तलावाचे सुशोभिकरण केंद्र सरकारच्या निधीतून महापालिका करत आहे गेल्या वर्षभरापासून सुमारे आठ कोटी रुपये खर्चाचे काम सुरू असून याद्वारे या तलावातील गाळ आणि जलपर्णी काढण्यात येत आहे. तर आता या ठिकाणचे पाणी सतत शुद्ध रहावे यासाठी महापालिकेने टेंडर काढले होते याला दिल्लीच्या कंपनीने प्रतिसाद दिला असून दोन कोटी 73 लाख रुपयांची ही निविदा महापालिका सभेत मंजूर करण्यात आली आहे त्यामुळे या तलावातील पाणी घाण राहणार नाही ते सतत शुद्ध होईल असा दावा महापालिका अधिकारी केला आहे.