येस न्युज मराठी नेटवर्क : नई जिंदगी येथील देसाई नगर मध्ये राहणाऱ्या सुरेखा संजू देवकर या महिलेने मारहाण झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे . दशरथ डिकोळे, दिलीप डिकोळे आणि अण्णा डिकोळे सर्व राहणार देसाई नगर , नई जिंदगी यांनी आपल्याला मारहाण केल्याचे सुरेखा देवकर यांनी म्हटले आहे. सकाळच्या भांडणांमध्ये तु मध्ये का पडली अशी विचारणा करत दशरथ डिकोळे यांनी प्रथम हाताने व नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दिलीप डिकोळे यांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून जखमी केल्याचे सुरेखा देवकर यांनी तक्रारीत म्हटले आहे . या प्रकरणी पोलीस हवालदार कांबळे अधिक तपास करीत आहेत