नवी दिल्ली : देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. काल 2 लाख 22 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या सव्वादोन लाखांच्या खाली आली आहे. मात्र 4 हजार 454 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. रुग्ण घटले असले, तरी कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. आतापर्यंत 3 लाख 3 हजार 720 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 67 लाख 52 हजार 447 वर गेला आहे. देशात 2 कोटी 37 लाख 28 हजार 11 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 3 हजार 720 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 27 लाख 20 हजार 716 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.