नवी दिल्ली : संसदेतील पावसाळी अधिवेशनात गुरुवारी पेगॅसस प्रकरणावरून जोरदार गोंधळ झाला. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत बाजू मांडण्यास उभे राहिले. तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांना बोलू दिले नाही. वैष्णव सरकारची बाजू मांडत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार पुढे सरसावले आणि त्यांनी मंत्र्यांच्या् हातून पेपर खेचून घेतले आणि फाडून टाकले . त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे मंत्री अश्विनी वैष्णव यांना बोलताही आले नाही.
गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव बोलायला उभे राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपसभापती वंकैय्या नायडू यांनी विरोधकांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना आपले वक्तव्य सदनाच्या पटलावर ठेवण्याची विनंती केली. “खासदारांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे – घेणे नाही असेच दिसते आहे , असे मत वंकैय्या नायडू यांनी मांडले . गोंधळामुळे शून्यकाळ आणि प्रश्नकाळही चालू शकलेला नाही. “विरोधी पक्षातील काही जण, विशेषत: तृणमूल काँग्रेसचे खासदार उठले आणि त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा्या हातातून पेपर घेतला आणि तो फाडून टाकला. असे वागणे खरेच दुर्दैवी आहे, असे मत भाजपा राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांनी नोंदवले आहे.