मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज कार्यशाळा संपन्न
सोलापूर: दक्षिण तालुक्यात आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गाव आत्मनिर्भर व सक्षम करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे.गावाचा विकास म्हणजेच राज्याचा विकास होय असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले
या कार्यशाळेतून शेतकरी, महिला व युवकांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त झाला.ग्राम कार्यक्षम बनविण्यासाठी नवे मार्ग, ग्रामविकासातील अभिनव उपक्रम, तसेच शाश्वत विकासाचे ध्येय या कार्यशाळेतून अधोरेखित झाले. “
यावेळी स्क्रीनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाईव्ह मार्गदर्शन दाखवण्यात आले. त्यांनी गावोगाव राबवल्या जाणाऱ्या योजनांचा नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले.
कार्यशाळेत स्वच्छ व हरित ग्रामविकासावर भर देण्यात आला. तसेच सुजलाम-सुफलाम व आत्मनिर्भर गाव घडविण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत,असेही आ.देशमुख म्हणाले.
या कार्यशाळेस सरपंच ज्योती राजेंद्र कुलकर्णी, प्रशांत सलगरे, बनसिद्ध पटवडेयार, प्रकाश सेतसंदी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ग्रामविकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मार्गदर्शन केले.