सोलापूर : तिघांची नावे दिल्लीला पाठवली विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाला आण ि काँग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्ष नव्हता. अजित दादा गटान े मंगळवारी उमेश पाटील यांची निवड करून हा विषय निकाली काढला. काँग्रेसला आठ दिवसांत जिल्हाध्यक्ष मिळेल, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले होते.
जिल्हा निरीक्षक मोहन जोशी यांनी या पदासाठी इच्छुक असलेले विजयकुमार हत्तुरे, राजेश पवार आण ि सातलिंग शटगार या तिघांची नावे प्रदेश कार्यालयाला सादर केली होती. प्रदेश कार्यालयान े ही नावे आता दिल्ली दरबारी पाठवल्याची कुजबुज आहे. तिघेही यापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटी आण ि सेवा दलामध्ये कार्यरत होते. या तिघांचा त्या काळातील कामांचा आढावा घेऊनच या निवडी होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळ े काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीकडे लक्ष असणार आहे.