नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या 15 ऑगस्टपासून लोकल सुरु करणार असल्याची घोषणा काल केली. रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाच स्वागत केले आहे. मात्र मुंबईमध्ये लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पण लसी संदर्भात सर्व डाटा राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे प्रवासासाठी प्रवेश करणाऱ्यांची जबाबदारी राज्याने घ्यावी, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान रावसाहेब यांनी राज्य सरकारला हे वक्तव्य करुन चांगलाच झटका दिला आहे.
लोकल प्रवासासाठी आवश्यक असणारा क्यू आर कोड पास तपासण्याची जबाबदारी राज्य सरकारनेच घ्यावी, अस रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे. हे वक्तव्य करुन दानवेंनी राज्य सरकारला एक प्रकारचा दणका दिला आहे. तसच हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचंही ते म्हणालेत. प्रवाशांसाठी स्मार्टफोन, क्यूआर कोड या अटींसंबंधी बोलताना मुख्यमंत्र्यांनी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती असे मतही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले . रेल्वेच्या प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हा क्यूआर कोड स्मार्टफोनवर मिळणार आहे. मात्र हा क्युआर कोड तपासण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल. त्यासाठी राज्य सरकराने यंत्रणा उभी करावी, असं म्हणत मुंबईकरांच्या सेवेसाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज असल्याचे ते म्हणाले.प्रवाशांचे प्रमाणपत्र तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वत:ची यंत्रणा उभी केली पाहिजे. कारण दोन डोस घेतलेल्यांचा डाटा राज्य सरकारकडेच आहे. त्यामुळे तशी सोय राज्याने करावी. ही राज्य सरकारची यंत्रणा आहे. त्यामुळे त्यांनीच ओळख पटवावी. रेल्वे त्यांना सुरळीत प्रवास करु देईल, असेही ते म्हणाले.