75,400/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर : बेगमपुर येथील संजय बब्रुवान जाधव यांचे मालकीचे श्री समर्थ इलेक्ट्रानीक दुकानाचे शटर वरील डाव्याबाजुचे नट बोल्ट काढुन शटर उचकटुन एलईडी टिव्ही व मोबाईल असा एकुण 30,500/- रू. किंमतीचा ऐवज चोरीस गेले म्हणून यातील फिर्यादी संजय बब्रुवान जाधव रा. बेगमपुर ता. मोहोळ यांच्या फिर्यादीवरून कामती पोलीस ठान्यात कलम 457, 380 प्रमाणे 17 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता.गुन्हयातील आरोपी विधी संघर्ष ग्रस्त बालक वय १७ वर्षे १० महीने [रा अर्धनारी ता मोहोळ] व रोहन गोरख मंडले, वय १९ वर्षे [ रा अर्धनारी ता मोहोळ] याना अटक करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी घरफोडी चोरीच्या गुन्हयांचा आढावा घेवून सदरचे गुन्हे उघडकीस आणणे कामी गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांचे पथक यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांचे पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरची घरफोडी चोरी ही मौजे अर्धनारी ता. मोहोळ येथील इसमांनी केली आहे. त्या अनुशंगाने अधिक माहिती घेवून पथक मौजे बेगमपुर ता. मोहोळ येथे दाखल झाले असता त्यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा केलेले इसम हे अर्धनारी ते बेगमपुर रोडने येत आहेत] त्या ठिकाणी जावून बातमीप्रमाणे पहाणी केली असता दोन इसम अर्धनारी रोडने लाल रंगाचे मोटार सायकलवर येताना दिसले त्यांना थांबवुन त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुशंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुरूवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विष्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांचेकडुन गुन्हयातील माल व त्यांनी गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण 75,400/- रू. किमतीचा एलईडी टिव्ही] मोबाईल व मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ खुणे, सहाय्यक फॊजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस हवालदार सलीम बागवान, पोलीस अंमलदार लालसिंग राठोड, अजय वाघमारे, चालक राहुल सुरवसे यांनी बजावली आहे.