सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर घोंगडे वस्ती येथे दगडफेक करणाऱ्या दोन व्यक्तींची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या दोन टीम रवाना झाल्याचे जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अमित म्हाळप्पा सुरवसे आणि निलेश लक्ष्मीकांत क्षिरसागर या दोन आरोपींची नावे स्पष्ट झाली असून त्यांनी पलायन करण्यासाठी वापरलेल्या एक्टिवा कंपनीच्या मोटरसायकलचा क्रमांकही पोलिसांना तपासात आढळून आला आहे.