सोलापूर,दि.२९ : बाळे येथील रेल्वे रुळाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने देगाव ते केगाव हा रस्ता वाहतुकीसाठी आज (मंगळवार) पासून ११ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक नियत्रंण शाखेच्यावतीने देण्यात आली आहे.
रेल्वे रुळाच्या दुरुस्तीमुळे मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून ११ जुलै रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत देगाव ते केगाव हा रस्ता येण्या जाण्यासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी केले आहे.