सोलापूर : जुळे सोलापूरातील सैफुल ते बॉम्बे पार्क जाणारा रोड जवळपास पाच वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते तद्नंतर सदर रस्त्यावर ड्रेनेजचे काम, नळ कनेक्शन, व पावसामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी, महिलावर्ग, वाहनधारक, ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. वेळोवेळी त्या भागातील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका व झोन कार्यालय येथे तक्रारी केलेल्या होत्या परंतु त्यांची कोणीच दखल घेत नव्हते शेवटी संबंधित नगरातील अनेक नागरिक यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर तातडीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे साहेब व नगर अभियंता कार्यालय यांना सदर समस्या बाबत लेखी निवेदन दिल्यानंतर तातडीने सैफुल ते बॉम्बे पार्क जाणाऱ्या रोडवर डांबरी रिमिक्स टाकून त्यावर रोलर फिरवून रस्ता व्यवस्थित करून दिला आहे. त्यामुळे सदर नगरातील नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला असून तातडीने सदर समस्या सोडवल्याबद्दल नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे मनापासून आभार व्यक्त करत असून आपले मनोगत व्यक्त करत आहेत की..
सध्या नगरसेवकांचा कार्यकाल संपलेला असून प्रशासन राजवट सुरू आहे त्यामुळे कुठलेही नगरसेवक सक्रिय होताना दिसत नाही परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या सातत्याने नागरिकांच्या समस्या मनावर घेऊन पाठपुरावा करून सोडवतात हे विशेष

.
अशा नागरिकांच्या समस्यासाठी धावून येणाऱ्या नगरसेविका राजश्री चव्हाण व त्यांचे पती भाजपचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण हे धावून येतात व समस्या सोडवतात त्यामुळे जुळे सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक त्यांच्या कार्याचे कौतुक करत आहेत अशा प्रतिक्रिया देत आहेत.
नगरसेवक असावा तर मा.नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्यासारखा असावा असे प्रत्येक नगरातून नागरिकाचे मनोगत येत आहेत.