• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यपाल दौरा यशस्वीतेसाठी दिलेली जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी

by Yes News Marathi
January 5, 2022
in इतर घडामोडी
0
राज्यपाल दौरा यशस्वीतेसाठी दिलेली जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल यांचा दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी संभाव्य सोलापूर जिल्हा हा दौरा नियोजित आहे. त्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी राज्यपाल यांचा दौरा यशस्वितेसाठी प्रशासनामार्फत देण्यात आलेली जबाबदारी परस्परात समन्वय ठेवून कार्यक्षमपणे पार पाडावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केली.

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात संभाव्य राज्यपाल दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी पवार मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस.के. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप, तहसीलदार माढा राजेश चव्हाण, बीएसएनएलचे एच.डी. माळगे, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता बी. एच. मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. डी. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बागडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

   निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार पुढे म्हणाल्या की, मा. राज्यपाल यांचा दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी संभाव्य सोलापूर जिल्हा दौऱ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग अंतर्गत सीएसआर फंडातून परतेवाडी(ता. माढा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बांधलेल्या दोन वर्ग खोल्यांचे उद्घाटन असे कार्यक्रम नियोजित आहेत. तरी विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, उत्पादन शुल्क, विमानतळ प्राधिकरण, बीएसएनएल, वीज वितरण कंपनी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी, असे त्यांनी सूचित केले.

       पुण्यश्लोक आहिल्यादेवी विद्यापीठाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभागाने विद्यापीठ परिसरातील हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड च्या जागेची पाहणी करावी. तसेच परतेवाडी येथे जाण्यासाठी रस्त्याची पाहणी करावी. जर रस्ता नादुरुस्त असेल तर तो तात्काळ दुरुस्त करून घ्यावा. आरोग्य विभागाने प्रोटोकॉल प्रमाणे आरोग्य पथक सर्व सोयी-सुविधांनी तयार ठेवावेत. राज्यपाल यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कन्व्हाय मध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने करावी, अशा सूचना श्रीमती पवार यांनी दिल्या.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पवार यांनी माननीय राज्यपाल यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने विद्यापीठात करण्यात आलेल्या तयारी ची माहिती बैठकीत सादर केली. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी राज्यपाल यांच्या संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाला जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती दिली व त्याप्रमाणे ती जबाबदारी कार्यक्षम पणे पार पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले

Previous Post

शिवसेना उपशहर प्रमुख संताजी भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

बळीराम साठे यांनी दिला जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Next Post
बळीराम साठे यांनी दिला जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बळीराम साठे यांनी दिला जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group