29 मे रोजी BCCI घोषणा करणार?
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमातील उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार 29 मे रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये याची घोषणा केली जाऊ शकते. गेल्या वर्षीही आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आलं होतं.
इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसर्या आणि तिसर्या कसोटी सामन्यांमध्ये 9 दिवसाचे अंतर आहे. अहवालानुसार, बीसीसीआय दुसर्या आणि तिसर्या कसोटीमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या दोन सामन्यांमधील अंतर 5 दिवसांनी कमी केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलसाठी अधिक वेळ मिळेल. तथापि, बीसीसीआयने अद्याप यासाठी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला औपचारिक विनंती केलेली नाही.