सोलापूर : ओम गर्जना युवाशक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार सायंकाळी सुप्रसिध्द बाल किर्तनकार ह.भ.प. माऊली महाराज (जाहुरकर)आळंदीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते..यावेळी ट्रस्टी अध्यक्ष शाम धुरी यांनी महाराजाना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी महाराज मनाले की जीवन जगत असताना कोणत्या ही गोष्टी गर्व नसावा, पैसे मुळे सख्या बहिणी भावाचे नाते तुटू लागले आहेत, बाप आणि मुली च नातं हे लग्नाच्या अक्षता पर्यंत असत म्हूणन बाप आपल्या मुलीला जीवनात काही कमी पडु देतं नाही. हे ही महाराजनी सांगतले आहे.. बाप आणि मुली यांचे कीर्तन सांगत असताना भक्तांना अश्रू अनावर झाले,या वेळी कीर्तनकार व भारत माता नगर,अतुल वस्ती, कुमठे साखर कारखाना, व परिसरातील सर्व भजनी मंडळ, मृदंगसाथ ह भ प ज्योतीराम चांगभले महाराज, ह भ प राहुल महाराज परीट गायन साथ ह भ प संजय पवार, बापू कापसे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आधारस्तंभ भक्तगण उपस्थित होते .

